चेकनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे सदैव कार्यान्वित ठेवा...
सावंतवाडी:आंबोली,सातार्डा व आरोंदा चेक नाक्यावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे विशेषतः बहुतेक वेळा बंद असल्याने गुन्हेगार जलदगतीने ताब्यात घेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत ते कॅमेरे सदैव सुरू ठेवून दूर करावेत अशी मागणी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.आज ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली त्यावेळी आजगाव येथील वेश्याव्यवसाय केलेल्या कारवाई संदर्भात त्यांचा अभिनंदन केलं
तसेच सावंतवाडी तालुक्यातील झाराप पत्रादेवी महामार्गावरील (झाराप झिरो पॉईंट, इन्सुलि चेक पोस्ट, बांदा) , आंबोली, सातार्डा व आरोंदा चेक पोस्ट वरील सीसीटीव्ही कॅमेरा बरेच वेळा बंद असल्यामुळे अपघात करून फरारी झालेला वाहन मिळतच नाही असे प्रकार घडत आहेत त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आली.यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार बाबुराव धुरी मायकल डिसूजा अजित सांगेलकर सिताराम राऊळ आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment