डिंगणे येथे झाड कोसळून घरांचे नुकसान....
बांदा:डिंगणे आंबेडकर नगर येथील रुक्मिणी विठ्ठल कदम व विजय विठ्ठल कदम यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास सागाचे झाड पडून नुकसान झाले. डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर यांनी मध्यरात्री तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
मंगळवारी सकाळी बांदा तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामसेविका सुवर्णा वाघ उपस्थित होत्या. या घटनेत रुक्मिणी कदम व विजय कदम यांचे प्रत्येकी ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment