दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित...

 तालुक्यात मंगळवारी सकाळपासुन पावसाने जोर धरल्याने अनेक रस्ते देखील जलमय झाले याचा ञास वाहनचालकांना सहन करावा लागला.<br>               


राञी वार्‍यासह झालेल्या पावसाने तिलारी दोडामार्ग महामार्गावर काही ठीकाणी झाडे मोडुन पडली.येळपयवाडी येथे राञी उशीरा झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.अनेक एसटी बसेस देखील अडकुन पडल्या याचा ञास प्रवाशांना करावा लागला.तर कामानिमित्त गोवा ठीकाणी जाण्यासाठी देखील उशीर झाला.काही<br>वेळाने तेथीलु स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक यांनी प्रयत्न करुन झाडाचा काही भाग बाजुला करुन तेथुन एकेरी वाहतुक सुरु केली.व गाड्या मार्गस्थ केल्या.<br>             माञ असे असताना बांधकाम विभाग सुशेगाद असल्याचे पाहावयास मिळत आहे.मार्गावर धोकादायक असणारी झाडे तोडुन वाहनचालक व प्रवाशांना होणारा ञास कमी करावा अशी मागणी होत आहे

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे