मडुरा प्रशालेची कु. स्वरा संदीप निऊंगरे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेची कु. स्वरा संदीप निऊंगरे २५२ (८४ टक्के) गुणांसह सर्वसाधारण ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. तिच्या यशामुळे मडुरा हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कु. स्वराचे व तिच्या पालकांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, संस्थेचे पदाधिकारी, समन्वय समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, पालक- ग्रामस्थ, मुख्याध्यापक सुहास वराडकर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे.<br>कु. स्वरा निऊंगरे हिने या अगोदर वक्तृत्व स्पर्धा, महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महासंघातर्फे घेण्यात येणारी गणित प्रज्ञा परीक्षा व विविध बाह्य परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे. मडुरा पंचक्रोशीमध्ये तिचे नाव आदर्श विद्यार्थी म्हणून कौतुकाने घेतले जाते.

Comments
Post a Comment