केसरकर यांचा पराभव करून ठाकरे शिवसेनेचा आमदार निवडून आणणारच...!

 सावंतवाडी ता. १५-: येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांचा पराभव करून ठाकरे गटाचा आमदार निवडून आणणार अशी ग्वाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटी दरम्यान दिली.


दरम्यान जे गेले ते गेले त्याची परवा फिकीर करू नका तुम्ही कामाला लागा भविष्यात दिवस आपलेच आहेत जनता आपल्या सोबत आहे आपली जनतेशी बांधिलकी ठेवा असे आज उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभेतील शिवसैनिकांना सांगितलं.तसंच लवकरच कोकणचा दौरा करणार त्यावेळी सावंतवाडी विधानसभेतील सर्व शिवसैनिकाला पदाधिकाऱ्यांना भेटणार चर्चा करणार व जनतेशी संवाद साधणार असा शब्दही ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.<br>विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली यावेळी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांच्या मुद्दयावर देखील चर्चा करण्यात आली.यावेळी खासदार विनायक राऊत,जिल्हा संपर्क अरुण भाई दुधवडकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क शैलेश  परब ,तालुका प्रमुख रुपेश राऊळ,यशवंत परब व संजय गवस  उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, चंद्रकांत कासार, तालुका संपर्क राजू नाईक, जिल्हा समन्वयक बाळा गावडे ,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेना गुणाजी गावडे, सागर नानोस्कर, योगेश नाईक , महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सर्व सावंतवाडी विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे