झाडाचा ओंडका बाजूला करताना डोक्याला लागल्याने भाजपचे माजी शहराध्यक्ष जखमी

 सावंतवाडा येथे विद्युतवाहिन्यांवर पडलेले झाड कटरच्या सहाय्याने तोडून बाजूला करताना त्याच्या दुसऱ्या बाजूचा ओंडक्याचा भाग डोक्यावर बसून सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे माजी शहराध्यक्ष समीर रेडकर जखमी झाले. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.


याबाबत अधिक माहिती अशी , रविवारी रात्री दोडामार्ग-सावंतवाडा येथे सासोलीहून विद्युतपुरवठा करणाऱ्या ११ के.व्ही च्या विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने त्याठिकाणी स्पार्क होऊन आगीचा भडका उडाला आणि विजपुरवठा खंडित झाला.त्यांनतर विद्युतपुरवठा बंद झाल्यावर हे झाड बाजूला करण्यासाठी वाडीतील ग्रामस्थ एकवटले .ग्रामस्थांनी कटरच्या सहाय्याने ते बाजूला केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर रेडकरही हे झाड बाजूला करण्यास मदत करत होते.त्याचदरम्यान तुटलेल्या झाडाच्या दुसऱ्या बाजूचा भाग त्यांच्या कपाळावर आदळला.यात त्यांचा डोळा इजा होण्यापासून थोडक्यात बचावला.लागलीच त्यांना ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेवून त्यांच्यावर उपचार केले .त्यांच्या कपाळाला आठ टाके पडले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे