अखेर बांधकाम विभागाला आली जाग; पानवळ येथील खचलेला भाग केला सुस्थितीत!

 बांदा :बांदा दोडामार्ग राज्य मार्गावर एमएनजीएल गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे रस्त्याच्या साईड पट्टीची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार साईड पट्टी खचत असल्याने अपघातात होत आहेत.  बांदा पानवळ येतील मोरी जवळील भराव खचल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता होती. याबाबतची बातमी माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगवर प्रसिद्ध झाली होती. 


व्हिडिओसह प्रसिद्ध झालेल्या या बातमीची अखेर बांधकाम विभागाने दखल घेत हा खचलेला भाग काळ्या दगडांच्या साहाय्याने बुजून बिंदू करण्यात आला आहे त्यामुळे संभाव्य अपघाताची शक्यता आता दूर झाली आहे. एमएनजीएल गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे पूर्ण रस्ताच धोकादायक बनला असून संबंधित कंपनीकडून पूर्ण रस्त्याची साईडपट्टी व्यवस्थित करून घ्यावी अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे