Posts

Showing posts from December, 2022

निवृत्त अधीक्षक एन.पी.मठकर यांचे अणाव येथील वृद्धाश्रमात अन्नदान

Image
 वेंगुर्ले,ता.३१: जिल्हा व सत्र न्यायालयाचे निवृत्त अधिक्षक एन. पी. मठकर यांनी आपली आई कै. सौ. रुक्मिणी फटू मठकर यांच्या ५२व्या स्मृतिदिनानिमित्त अणाव येथील आनंदाश्रय या वृद्धाश्रमात अन्नदान केले. दिवंगत आईच्या स्मृतींना उजाळा देताना बहुसंख्य वृद्धांना मायेचा घास दिल्याबद्दल वृद्धांनी त्यांचे आभार व्यक्त केले. एन. पी. मठकर यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी २००९ साली आपल्या आईच्या नावे कै.सौ. रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत आरोग्य आणि रक्तदान शिबिरासारखे आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. मठकर यांच्या या कार्याची दखल जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच थायलंड-बँकॉक येथेही घेण्यात आली आहे. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी करुन समाजाचे आपल्यावर असलेले, ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचे, श्री.मठकर यांनी सांगितले. आनंदाश्रय येथे केलेल्या, अन्नदानप्रसंगी मधुकर सावंत, मोहन नाईक, बबन परब, चेतन परब उपस्थित होते.

वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

Image
वेंगुर्ले: तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोमवार दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय , सुंदरभाटले येथे आयोजित केला आहे .   वेंगुर्ले तालुक्यातील २३ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा ने जोरदार मुसंडी मारत १३ सरपंच व १६ उपसरपंच विजयी करत तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष असल्याचे दाखवून दिले . या सर्वांचा सत्कार समारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली , लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .     लोकसभा प्रवास अभियान बैठक ------------------------------------------    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघ जिंकण्यासाठी " लोकसभा प्रवास योजना " अंमलात आणली आहे . या योजनेअंतर्गत प्रत्येक बुथवर एक प्रवासी कार्यकर्ता तयार करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रचना तयार करण्यात येणार आहे . अशा वेंगुर्ले तालुक्यातील ९३ बुथ वरील प्रवासी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर देणार आ...

इन्सुली घाटी शिवशाही बस इनोव्हा कार अपघात

Image
 बांदा : इन्सुली घाटीत शिवशाही बस आणि इनोव्हामध्ये अपघात झाला असून इनोव्हाचे फार मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ईनोवा चालक हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घालवण्यात आले. शिवशाही बस मुंबईच्या दिशेने जात होती तर इनोव्हा सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने जात होती. या अपघातामुळे सावंतवाडी इन्सुलि घाट बांदा मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी जावेद खतीब बिनविरोध

Image
 बांदा,ता.३०: शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या जावेद खतीब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपकडे संख्याबळ असल्याने व निर्धारित वेळेत केवळ खतीब यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजित येरवळकर व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांनी खतीब यांची निवड जाहीर केली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. यावेळी मावळते सरपंच अक्रम खान, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, शिवसेनेचे सदस्य साई काणेकर, महिला सदस्या देवल येडवे, रिया येडवे, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, शिल्पा परब, रेश्मा सावंत, मावळत्या सदस्या उमांगी मयेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच दीपक सावंत, सिद्धेश महाजन, गुरु सावंत, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, राजा सावंत, दिलीप कोरगावकर, साई धारगळकर, शैलेश केसरकर, सुधीर साटेलकर, मंदार महाजन, गजानन मोर्ये, अक्षय मयेकर, सुधीर शिर...

वेदांत राणे भालाफेकमध्ये प्रथम

Image
 मसुरे:कोल्हापूर विभाग स्तरावरील सातारा येथील शालेय मैदानी स्पर्धेत  17 वर्षाखालील *भाला फेक*  या क्रीडा प्रकारात ज्युनिअर कॉलेज,कुडाळ च्या 11 वी sci मधील वेदांत रघुनंदन राणे याने प्रथम क्रमांक मिळविला आहे . त्याची पुणे येथे होणाऱ्या  राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे . प्रशालेच्या सर्व पदाधिकारी ,शिक्षक ,विद्यार्थी व संस्थाचालकांनी वेदांत चे अभिनंदन केले आहे.

खेमराज बांदाच्या रंगशिशिर २०२२चा थाटात शुभारंभ

Image
 

आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या,अन्यथा तीव्र आंदोलन:साईप्रसाद काणेकर

Image
  सावंतवाडी,ता.२९: बांदा येथे २०१९ मध्ये तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून मोठे नुकसान झाले होते.याबाबतचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मंजूर झाली होती.मात्र अद्याप काही व्यापाऱ्यांना ही नुकसानभरपाई मिळालेली नाही.तहसीलदार कार्यालयाकडे ही नुकसानभरपाई जमा झालेली असूनही विलंब होत आहे.ही नुकसानभरपाई येत्या आठ दिवसात व्यापाऱ्यांना देण्यात यावी.अन्यथा तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी निवेदनातून दिला आहे. बांदा येथील पुरहानी झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई बाबत होत असलेल्या विलंबाबाबत साईप्रसाद काणेकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांना आज निवेदन देत तात्काळ मदत देण्याची मागणी केली.यावेळी प्रशांत पांगम,ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.

मोपा ५ जानेवारीपासून उड्डाणासाठी सज्ज, परिसरात पाच मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...

Image
विमानतळ सुरू होण्यापूर्वी आज स्थानिकांना मिळाली पाहण्याची संधी... पणजी ता. २८:मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ ५ जानेवारीपासून उड्डाणासाठी सज्ज होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिवसाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशी १५० विमाने उतरणार आहेत, अशी माहिती मोपा विमानतळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मिलिंद पैदलकर यांनी दिली. दरम्यान या ठिकाणी ५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत विमानाची तपासणी करण्यासाठी बाजूलाच सुरक्षित जागा सुद्धा ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. उद्घाटनानंतर विमानतळ सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिकांना पाहण्यासाठी ते खुले करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना  श्री.पैदलकर यांनी ही माहिती दिली.      ते पुढे म्हणाले, विमान उड्डाणासाठी आवश्यक सर्व सोई - सुविधा पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत विमानतळ सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते ही लवकरच पूर्ण होईल. तर येथील विद्युत पुरवठा सौर ऊर्जेवर होणार असून ५ मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्या सारख्या आपत्कालिन परिस्थितीत विम...

मळगाव सर्व्हिस रोड व ब्रिजखालील खड्डे तात्काळ बुजवा

Image
 सावंतवाडी:मळगाव येथील मळगाव सर्विस रोड व ब्रिज खाली पडलेल्या खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता महेश खट्टी यांच्याकडे केली. दरम्यान हे खड्डे त्वरित बुजवण्यात येईल असे आश्वासन श्री खट्टी यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याबाबत अधिक माहिती अशी की मळगाव येथील सर्विस रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी वारंवार नागरिकांच्या तक्रार येत असल्याने आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता यांचे लक्ष वेधून त्वरित बुजवण्याचे मागणी केली. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, सिद्धेश तेंडुलकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, हिदायतुल्ला खान, राजगुरू बावतीस फर्नांडिस अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आणि पत्रकार अनंत जाधव यांचा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मान

Image
ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेकडून कौतुक  पत्रकारांनी जनतेचे नेतृत्व करावे;जेष्ठ पत्रकार सचिन परब   कोल्हापूर दि.२८ डिसेंबर (प्रतिनिधी) :ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि दैनिक लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, पत्रकारांनी जनतेचे नेतृत्व करावे तसेच रक्ता अभावी रुग्णांचे प्राण जाऊ नये म्हणून सिंधू रक्तमित्र संघटना घेत असलेली काळजी समाजासाठी प्रेरणादायी आहे.  सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि दैनिक लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने जेष्ठ पत्रकार जतिन देसाई, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ संभाजी खराट, सचिन परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  यावेळी ऐजेएफसीचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, सरचिटणीस बाळकृष्ण कासार, प्रदेश अध्यक्षा कांचन जांबोटी,जी. बी. राजपूत, नि...

आसोली गावच्या उपसरपंच पदी संकेत धुरी यांची बिनविरोध निवड...

Image
ग्रामस्थांकडून विजयी पॅनलचे अभिनंदन; युवाईची "क्रेझ" दिसल्याने विकासाची अपेक्षा... वेंगुर्ले ता. २८ :आसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी संकेत धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया काल पार पडली. त्यानंतर सरपंच बाळा जाधव यांच्यासह उपसरपंच व सर्व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. दरम्यान यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवाईची वेगळी "क्रेझ" पाहायला मिळाली. त्यामुळे युवाईचा उत्साह पाहता येणाऱ्या काळात नक्कीच गावचा विकास होईल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.      यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उदय धुरी, आसोली विकास संस्था माजी चेअरमन सदानंद गावडे, ग्रामपंचायत माजी सदस्य संजय गावडे, प्रकाश रेगे, देवेंद्र धुरी, गुरुनाथ घाडी, प्रकाश धुरी, माजी सरपंच सुजाता देसाई, भगवान जाधव, सावळाराम जाधव, भारती गावडे, रेश्मा धुरी, आनंद धुरी, बाळकृष्ण धुरी, संदीप धुरी, नारायण राणे, संतोष धुरी, साक्षी घाडी, नारायण पाटील, आत्माराम धुरी, रिया कुडव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.   ...

कुडाळ हायस्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

Image
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच प्रशालेच्या 'बाबा वर्दम ' रंगमंचावर उत्साहात पार पडला . याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सरकार्यवाह आनंद वैद्य , प्रमुख पाहुणे डॉ . मकरंद परुळेकर ,संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिरसाट , सहकार्यवाह सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक दादा शिरहट्टी , उपमुख्याध्यापक दिनेश आजगावकर ,माजी पर्यवेक्षिका सुलभा देसाई ,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्यामसुंदर परब इत्यादी उपस्थित होते .       चंद्रशेखर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून वातावरण निर्मिती केली . आपल्या प्रास्ताविकामध्ये दिनेश आजगावकर यांनी विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच भविष्यातील शाळेची ध्येयधोरणे यांचा आढावा घेतला .पर्यवेक्षक महेश ठाकूर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख  करून दिली. मुख्याध्यापक दादा शिरहट्टी यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले .       सर्व...

विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेत साहिश व श्रीयाचे यश

Image
 .              क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व विभागीय क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले.           नुकत्याच डेरवण, रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या विभागीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 10 मीटर ओपन साईट, 10 मीटर पीप साईट व 10 मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात घेण्यात आली. यात कुमार साहिश दिगंबर तळणकर (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव) याने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात 10 मीटर पिस्तूल प्रकारात 400 पैकी 373 गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले याच क्रीडा प्रकारात कुमारी श्रिया अतुल नाखरे (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) हिने 400 पैकी 362 गुण मिळवून रौप्य पदक पटकाविले. वरील दोन्ही खेळाडूंची रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.   ...

तळवडा हायस्कुलच्या दहावी १९९२ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात

Image
 कुडाळ (प्रतिनिधी) : रविवार दि. २५ डिसेंबर रोजी झालेला श्री जनता विद्यालय तळवडे हायस्कूलच्या दहावी १९९१ – ९२ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा “स्नेह मेळावा..” आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्ताने व सर्व स्नेही जणांना एकत्र भेटण्याच्या उद्देशाने, सोबतच गुरुजनांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्याकरिता भरलेला हा मेळावा म्हणजे नवीन ऊर्जा, नवीन उत्साह निर्माण करणारी शिदोरीच होता. शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्याला ज्यांच्या संस्कारातून आपण वाढलो, घडलो त्या वंदनीय गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमांची सुरुवात या मान्यवर गुरुजनांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी विद्यालयाचे सध्याचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारीवर्गही उपस्थित होते.. यावेळी सर्व गुरूजनांप्रती आदर व्यक्त करीत त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या आनंदसोहळ्यात गृप मधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुमारे ३० वर्ष...

वेंगुर्ले तालुक्यात उपसरपंच निवडीत १५ पैकी १० ठिकाणी भाजप

Image
 वेंगुर्ले :वेंगुर्ले तालुक्यातील 15 ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत 11 ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. तर 4 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतदान घ्यावे लागले. या 15 पैकी 10 ठिकाणी भाजपाचे उपसरपंच निवडून आले असून पुन्हा एकदा वैगुर्ले तालुक्यात भाजप पक्षच नंबर वन बनला आहे. निवडणूक झालेल्या या 15 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झालेल्या 10 ग्रामपंचायतीत परबवाडा ग्रामपंचायत : सरपंच शमिका शंकर बांदेकर तर उपसरपंच : विष्णू उर्फ पपु परब. आसोली ग्रामपंचायत : सरपंच बाळा मधुकर जाधव तर उपसरपंच संकेत संदीप धुरी. तुळस ग्रामपंचायत : सरपंच रश्मी रामचंद्र परब व उपसरपंच : सचिन सुरेश नाईक. पाल ग्रामपंचायत : सरपंच कावेरी कमलेश गावडे व उपसरपंच : प्रिती प्रशांत गावडे. वेतोरे ग्रामपंचायत : सरपंच प्राची प्रदीप नाईक व उपसरपंच : संतोषी सुधीर गावडे. म्हापण ग्रामपंचायत, सरपंच : आकांक्षा विश्वनाथ चव्हाण व उपसरपंच : श्रीकृष्ण लाला ठाकुर. कुशेवाडा ग्रामपंचायत, सरपंच : निलेश दत्तात्रय सामंत व उपसरपंच : महादेव अनंत सापळे. भोगवे ग्रामपंचायत, सरपंच : अं...

शिरोड्यात काँग्रेसचा उपसरपंच

Image