मळगाव सर्व्हिस रोड व ब्रिजखालील खड्डे तात्काळ बुजवा
सावंतवाडी:मळगाव येथील मळगाव सर्विस रोड व ब्रिज खाली पडलेल्या खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता महेश खट्टी यांच्याकडे केली. दरम्यान हे खड्डे त्वरित बुजवण्यात येईल असे आश्वासन श्री खट्टी यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की मळगाव येथील सर्विस रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी वारंवार नागरिकांच्या तक्रार येत असल्याने आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता यांचे लक्ष वेधून त्वरित बुजवण्याचे मागणी केली.
यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, सिद्धेश तेंडुलकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, हिदायतुल्ला खान, राजगुरू बावतीस फर्नांडिस अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment