कुडाळ हायस्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच प्रशालेच्या 'बाबा वर्दम ' रंगमंचावर उत्साहात पार पडला . याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सरकार्यवाह आनंद वैद्य , प्रमुख पाहुणे डॉ . मकरंद परुळेकर ,संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिरसाट , सहकार्यवाह सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक दादा शिरहट्टी , उपमुख्याध्यापक दिनेश आजगावकर ,माजी पर्यवेक्षिका सुलभा देसाई ,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्यामसुंदर परब इत्यादी उपस्थित होते .
चंद्रशेखर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून वातावरण निर्मिती केली . आपल्या प्रास्ताविकामध्ये दिनेश आजगावकर यांनी विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच भविष्यातील शाळेची ध्येयधोरणे यांचा आढावा घेतला .पर्यवेक्षक महेश ठाकूर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख
करून दिली. मुख्याध्यापक दादा शिरहट्टी यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले .
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन झाले . वर्षभरातील प्रशालेची वाटचाल अर्थात अहवालाचे वाचन ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक राजकिशोर हावळ यांनी केले . विविध स्पर्धांमधील यश , शैक्षणिक गुणवत्ता , क्रीडा तसेच अन्य उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले .पारितोषिक वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .शाळेप्रती कृतज्ञता म्हणून शाळेकडे ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून ही पारितोषिके दरवर्षी दिली जातात . शाळेचे माजी विद्यार्थी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मकरंद परुळेकर यांचा सत्कार आनंद वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विराज तेली (बारावी आर्ट्स ) या विद्यार्थ्याने डॉक्टर परुळेकर यांचे काढलेले पेन्सिल पेंटींग फोटो फ्रेम करून त्यांना गिफ्ट म्हणून दिले . विराजच्या या कलेची सर्वांनीच वाहवा केली . आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ . परुळेकर यांनी 'करिअरच्या शोधात जाताना योग्य वेळी योग्य निर्णय घ्या तसेच अभ्यासात भरपूर सराव करा ' असा सल्ला दिला .अध्यक्षीय भाषणात आनंद वैद्य यांनी 'प्रगती मध्ये येणारे धोके ओळखून योग्य वेळी योग्य उपाय योजा 'असे सांगितले .
स्नेहसंमेलनानंतर पुढील दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली . कार्यक्रमांमध्ये कुमारी शर्वाणी करंबेळकर ,भार्गवी गाड ,सुखी सामंत , स्वस्तिका दुधगावकर या गायक कलाकारांनी आपल्या गायनाने कार्यक्रमांमध्ये रंगत आणली सर्व वादक कलाकारांनी त्यांना उत्तम साथ दिली . कार्यक्रमप्रसंगी द्वारकानाथ घुर्ये , डॉ . अमोघ चुबे तसेच अनेक पालकांनी उपस्थिती दर्शविली . पर्यवेक्षक आनंदा गावडे यांच्या आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम होऊन कार्यक्रम संपन्न झाला..या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी गोसावी यानी केले

Comments
Post a Comment