इन्सुली घाटी शिवशाही बस इनोव्हा कार अपघात
बांदा : इन्सुली घाटीत शिवशाही बस आणि इनोव्हामध्ये अपघात झाला असून इनोव्हाचे फार मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ईनोवा चालक हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घालवण्यात आले.
शिवशाही बस मुंबईच्या दिशेने जात होती तर इनोव्हा सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने जात होती. या अपघातामुळे सावंतवाडी इन्सुलि घाट बांदा मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Comments
Post a Comment