आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या,अन्यथा तीव्र आंदोलन:साईप्रसाद काणेकर
सावंतवाडी,ता.२९:बांदा येथे २०१९ मध्ये तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून मोठे नुकसान झाले होते.याबाबतचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मंजूर झाली होती.मात्र अद्याप काही व्यापाऱ्यांना ही नुकसानभरपाई मिळालेली नाही.तहसीलदार कार्यालयाकडे ही नुकसानभरपाई जमा झालेली असूनही विलंब होत आहे.ही नुकसानभरपाई येत्या आठ दिवसात व्यापाऱ्यांना देण्यात यावी.अन्यथा तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी निवेदनातून दिला आहे.
बांदा येथील पुरहानी झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई बाबत होत असलेल्या विलंबाबाबत साईप्रसाद काणेकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांना आज निवेदन देत तात्काळ मदत देण्याची मागणी केली.यावेळी प्रशांत पांगम,ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment