आसोली गावच्या उपसरपंच पदी संकेत धुरी यांची बिनविरोध निवड...
ग्रामस्थांकडून विजयी पॅनलचे अभिनंदन; युवाईची "क्रेझ" दिसल्याने विकासाची अपेक्षा...
वेंगुर्ले ता. २८:आसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी संकेत धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया काल पार पडली. त्यानंतर सरपंच बाळा जाधव यांच्यासह उपसरपंच व सर्व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. दरम्यान यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवाईची वेगळी "क्रेझ" पाहायला मिळाली. त्यामुळे युवाईचा उत्साह पाहता येणाऱ्या काळात नक्कीच गावचा विकास होईल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ धुरी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उदय धुरी, आसोली विकास संस्था माजी चेअरमन सदानंद गावडे, ग्रामपंचायत माजी सदस्य संजय गावडे, प्रकाश रेगे, देवेंद्र धुरी, गुरुनाथ घाडी, प्रकाश धुरी, माजी सरपंच सुजाता देसाई, भगवान जाधव, सावळाराम जाधव, भारती गावडे, रेश्मा धुरी, आनंद धुरी, बाळकृष्ण धुरी, संदीप धुरी, नारायण राणे, संतोष धुरी, साक्षी घाडी, नारायण पाटील, आत्माराम धुरी, रिया कुडव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नुकत्याच पारपडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आसोलीत ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत सरपंच पदासह दोनच सदस्य पदासाठी लढत झाली. मात्र उर्वरित सदस्य हे बिनविरोध जाहीर करण्यात आले होते. यातील जाधव यांच्यासह सदस्य म्हणून निवडून आलेल्या स्वप्निल गावडे व राकेश धुरी या विजयी उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. मात्र या तीनही उमेदवारांनी बहुमतांनी आपले वर्चस्व राखले. विजयी हे तीनही उमेदवार ग्राम विकास पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. तर बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये प्रभाग एक मधून तुकाराम कोंबे, शितल घाडी, प्रभाग दोन मधून प्राजक्ता जाधव, राखी धुरी, संकेत धुरी, तर प्रभाग तीन मधून रति नाईक व नेत्रा राणे आदींचा समावेश होता. या निवडणुकीत ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व राहिल्याने उपसरपंच पदी श्री. धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Comments
Post a Comment