वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ले: तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोमवार दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय , सुंदरभाटले येथे आयोजित केला आहे .
  वेंगुर्ले तालुक्यातील २३ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा ने जोरदार मुसंडी मारत १३ सरपंच व १६ उपसरपंच विजयी करत तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष असल्याचे दाखवून दिले . या सर्वांचा सत्कार समारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली , लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .

    लोकसभा प्रवास अभियान बैठक
------------------------------------------ 
  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघ जिंकण्यासाठी " लोकसभा प्रवास योजना " अंमलात आणली आहे . या योजनेअंतर्गत प्रत्येक बुथवर एक प्रवासी कार्यकर्ता तयार करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रचना तयार करण्यात येणार आहे . अशा वेंगुर्ले तालुक्यातील ९३ बुथ वरील प्रवासी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुल काळसेकर देणार आहेत . या बैठकीत बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख सुद्धा उपस्थित रहाणार आहेत .
  तरी वेंगुर्ले तालुक्यातील भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर यांनी केले आहे .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे