बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी जावेद खतीब बिनविरोध

 बांदा,ता.३०: शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या जावेद खतीब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपकडे संख्याबळ असल्याने व निर्धारित वेळेत केवळ खतीब यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजित येरवळकर व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांनी खतीब यांची निवड जाहीर केली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.


यावेळी मावळते सरपंच अक्रम खान, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, शिवसेनेचे सदस्य साई काणेकर, महिला सदस्या देवल येडवे, रिया येडवे, रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, शिल्पा परब, रेश्मा सावंत, मावळत्या सदस्या उमांगी मयेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच दीपक सावंत, सिद्धेश महाजन, गुरु सावंत, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, राजा सावंत, दिलीप कोरगावकर, साई धारगळकर, शैलेश केसरकर, सुधीर साटेलकर, मंदार महाजन, गजानन मोर्ये, अक्षय मयेकर, सुधीर शिरसाट, सुनील राऊळ, महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित, श्रुती कल्याणकर आदिसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे