वेंगुर्ले तालुक्यात उपसरपंच निवडीत १५ पैकी १० ठिकाणी भाजप
वेंगुर्ले :वेंगुर्ले तालुक्यातील 15 ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत 11 ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. तर 4 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतदान घ्यावे लागले. या 15 पैकी 10 ठिकाणी भाजपाचे उपसरपंच निवडून आले असून पुन्हा एकदा वैगुर्ले तालुक्यात भाजप पक्षच नंबर वन बनला आहे.
निवडणूक झालेल्या या 15 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झालेल्या 10 ग्रामपंचायतीत
परबवाडा ग्रामपंचायत : सरपंच शमिका शंकर बांदेकर तर उपसरपंच : विष्णू उर्फ पपु परब. आसोली ग्रामपंचायत : सरपंच बाळा मधुकर जाधव तर उपसरपंच संकेत संदीप धुरी. तुळस ग्रामपंचायत : सरपंच रश्मी रामचंद्र परब व उपसरपंच : सचिन सुरेश नाईक. पाल ग्रामपंचायत : सरपंच कावेरी कमलेश गावडे व उपसरपंच : प्रिती प्रशांत गावडे. वेतोरे ग्रामपंचायत : सरपंच प्राची प्रदीप नाईक व उपसरपंच : संतोषी सुधीर गावडे. म्हापण ग्रामपंचायत, सरपंच : आकांक्षा विश्वनाथ चव्हाण व उपसरपंच : श्रीकृष्ण लाला ठाकुर. कुशेवाडा ग्रामपंचायत, सरपंच : निलेश दत्तात्रय सामंत व उपसरपंच : महादेव अनंत सापळे. भोगवे ग्रामपंचायत, सरपंच : अंकिता अंकुश वायंगणकर व उपसरपंच : रुपेश मुंड्ये. पालकरवाडी ग्रामपंचायत, सरपंच : सदाशिव यशवंत पाटील व उपसरपंच : उमा रमेश करंगुटकर. दाभोली ग्रामपंचायत, सरपंच : उदय शिवराम गोवेकर व उपसरपंच : फिलसुअनीता फर्नांडिस. केळुस ग्रामपंचायत, सरपंच : योगेश कृष्णा शेट्ये व उपसरपंच : संजीव केशव प्रभू निवडले गेले. बिनविरोध मध्ये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर उर्वरित 4 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यात मठ ग्रामपंचायत उपसरपंच पदी महादेव गावडे
मठ ग्रामपंचायत, सरपंच : रुपाली अजित नाईक तर उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. महादेव शिवानंद गावडे यांना 6 मते तर महेश सावंत यांना 4 मते मिळाल्याने गावडे विजयी ठरले.
उभादांडा उपसरपंचपदी कालेस्तिन आल्मेडा
उभादांडा ग्रामपंचायत, सरपंच : निलेश जयप्रकाश चमणकर व उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. कालेस्तिन कार्मिस आल्मेडा आणि बळीराम कुबल यांच्यामध्ये कुबल यांना 8 मते तर आल्मेडा यांना 9 मते मिळाल्याने त्या विजयी ठरल्या.
शिरोडा उपसरपंचपदी चंदन हाडकी
शिरोडा ग्रामपंचायत, सरपंच : लतिका लक्ष्मण रेडकर तर उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली यामध्ये चंदन हाडकी यांना 10 मते आणि मयुरेश शिरोडकर यांना 6 मते मिळाल्याने हाडकी विजयी ठरले.
वजराट ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रियांका केरकर
वजराट ग्रामपंचायत, सरपंच : अनन्या आनंद पुराणिक व उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यावेळी प्रियांका साईप्रसाद केरकर याना 7 मते तर नामदेव मधुकर कांदे यांना 3 मते मिळाल्याने केरकर विजयी ठरल्या.
या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Comments
Post a Comment