Posts

Showing posts from March, 2025

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

Image
 • मंत्री  शंभूराज देसाई,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक  •सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार •तारापोरवाला मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप मिळणार मत्स्यालयाच्या  विकासास संयुक्त उपक्रमाद्वारे तत्वतः मान्यता;पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सिंधुदुर्ग साठी पर्यटन अधिकाऱ्याचे रिक्त असलेले पद सुद्धा तातडीने भरण्याचे मंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. १२ : तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपयोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यव...

पिंपळपान महिला बचत गटाच्या जागतिक महिला दिनात छत्रपतींची क्रेझ

Image
जागतिक महिला दिनानिमित्त दोडामार्ग शहरातील पिंपळपान ग्रुपने आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात कोकण.. महाराष्ट्राची कला - संस्कृती तसेच राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाची जबरदस्त 'क्रेझ' 'पहावयास मिळाली. या कार्य क्रमांसोबत आयोजित झालेल्या पाककला स्पर्धेलाही महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.     येथील पिंपळेश्वर सभागृहात पिंपळपान अंतर्गत च्या पिंपळपान महिला बचत गटाने पाककला स्पर्धेत सोबत लावणी, फनी गेम्स, रेकॉर्ड डान्स,नाटीका वगैरे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरात नुकत्याच निधन पावलेल्या सुपरीचीत कै. मीनाक्षी उर्फ वत्सला जयवंत देसाई अर्थात वत्सला मावशी यांना श्रद्धांजली व सावित्रीबाई फुले यांच्या तसबीरी ला पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात सहभागी महिला कलाकारांनी   कोकण, महाराष्ट्राची  संस्कृती -परंपरा दर्शविणारी तसेच राजमाता जिजाऊ शिवाय शिवछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगणारे अनेक बहारदार कार...

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे

Image
 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी ३६ हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी ७९७८ कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ४३०० कोटीचा बांबू लागवड प्रकल्प,  शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातील ५८१८ गावांमध्ये ४२७ कोटी रुपये किमतीची एक लाख ४८ हजार ८८८ कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे आणि त्यासाठी ३८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण राज्य सरकार आखत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा...

डांगमोडेत जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रतिसाद

Image
 डांगमोडे येथील नवतरुण मित्रमंडळाच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मसुरे डांगमोडे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत महिलांच्या गटात एस. एम. सिंधु स्पोर्ट्स कुडाळ, तर पुरुष गटात जय गणेश पिंगुळी संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद महिला गटात होली क्रॉस, सावंतवाडी आणि पुरुष गटात संघर्ष कोचराने पटकावले. दोन्ही गटातील विजेत्या संघांना रोख सात हजार आणि उपविजेत्या संघाला ५००० रुपये नवतरुण मित्रमंडळातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सर्व चषक शिवाजी गंगाराम ठाकुर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केले होते. महिला गटात उत्कृष्ट पकड पलक गावडे (एस. एम. सिंधु स्पोर्ट्स कुडाळ), उत्कृष्ट चढाई निकिता राऊत (होली क्रॉस सावंतवाडी), अष्टपैलू खेळाडू काजल नार्वेकर (एस. एम. सिंधु स्पोर्ट्स कुडाळ), तर पुरुष गटात अष्टपैलू खेळाडू परेश वालावलकर (जय गणेश पिंगुळी), उत्कृष्ट चढाई गणपत दाभोलकर (संघर्ष कोचरा), पकड राज सावंत (जय गणेश पिंगुळी) यांची निवड करण्यात आली. या सर्वांना प्रत्येकी पाचशे एक रुपये आणि स्मृतीचषक प्...

मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविले : श्वेता कोरगावकर

Image
  महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी वाजता वेंगुर्ले येथील भाजप कार्यालयात तालुक्यातील १० कर्तृत्वान महिलांचा सन्मान भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व अॅड. सुपमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महीला ता.अध्यक्षा सुजाता पडवळ, शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, ता. सरचिटणीस पपु परब, प्रार्थना हळदणकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, आकांक्षा परब, समिधा कुडाळकर, हसीनाबेन मकानदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.<br>यावेळी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर म्हणाल्या कि महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करतानाच वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुल्यांच्या गौरवात भर घालणाऱ्या निवडक दहा महिलांचा सन्मान करून वेंगुर्लात ज...

आरोपींची गय केली जाणार नाही !;पालकमंत्र्यांची ग्वाही

Image
 माटणे येथे पत्रकारांना अरेरावी करण्याची घटना अतिशय निंदनीय आहे. संशयित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना आपण केल्या आहेत. या आरोपींची अजिबात गय केली जाणार नाही, त्यामुळे निश्चिंत राहा. प्रशासन जर कारवाई करण्यात कुचराई करत असेल असे आपणास जाणवल्यास आपण थेट माझ्याशी संपर्क साधा, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. माटणे येथे तालुक्यातील तीन पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५:३० वा.च्या सुमारास गेले होते. येथील पूर्वाचार देवस्थान जवळील काट्याजवळ रस्त्यालगतच पत्रकारांना मोठ्या प्रमाणात माती साठा करून ठेवल्याचे दिसले. त्यामुळे पत्रकारांनी तेथे जात फोटो काढण्याचा प्रयत्न केला. खासगी जमिनीत हा मातीसाठी असल्याने पत्रकारांनी जमिनीच्या गेटबाहेर उभे राहून मातीचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संशयित नवनाथ नाईक हा त्याच्या कारने तेथे आला व एका पत्रकाराला फोटो टिपण्यास मज्जाव केला. तसेच पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. गेट...

दांडेली परिसरात ४०० काजू कलमे खाक

Image
 दांडेली वरचावाडा व न्हावेली-रेवटेवाडी येथील सुमारे चार ते पाच एकरांवरील काजू बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये ४०० ते ५०० काजू कलमे जळून खाक झाल्याची माहिती दांडेली ग्रामस्थ अमित नाईक यांनी दिली.दांडेली व न्हावेली सीमाभागात असलेल्या काजू बागायतीमधून विद्युत वाहिनी जाते. वासुदेव तुकाराम नाईक,दिलीप हरमलकर, भागीरथी नाईक, हनुमंत परब यांची मिळून ४०० ते ५०० काजू कलमे जळाली. पाच वर्षे मेहनत घेत, कर्ज काढून काजू कलमे लावली होती. परंतु, अचानक लागलेल्या या आगीत अंदाजे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु, सर्व प्रयत्न तोकडे पडले. ही आग बागेतून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांना शॉर्टसर्किट होऊन लागल्याचा अंदाज शेतकरी अमित नाईक यांनी वर्तविला. बागेत पालापाचोळा व गवत असल्याने आग भडकली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बागायती जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वासुदेव नाईक, दिलीप हरमलकर, उदय हरमलकर, राहुल नाईक, दिनेश पेडणेकर, हरी नाईक, ओंमकार पेडणेकर, रमेश पेडणेकर, सिद्धेश नाईक, अमोल परब, बाळू पेडणेकर, त...