डांगमोडेत जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रतिसाद
डांगमोडे येथील नवतरुण मित्रमंडळाच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मसुरे डांगमोडे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत महिलांच्या गटात एस. एम. सिंधु स्पोर्ट्स कुडाळ, तर पुरुष गटात जय गणेश पिंगुळी संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद महिला गटात होली क्रॉस, सावंतवाडी आणि पुरुष गटात संघर्ष कोचराने पटकावले. दोन्ही गटातील विजेत्या संघांना रोख सात हजार आणि उपविजेत्या संघाला ५००० रुपये नवतरुण मित्रमंडळातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सर्व चषक शिवाजी गंगाराम ठाकुर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केले होते.
महिला गटात उत्कृष्ट पकड पलक गावडे (एस. एम. सिंधु स्पोर्ट्स कुडाळ), उत्कृष्ट चढाई निकिता राऊत (होली क्रॉस सावंतवाडी), अष्टपैलू खेळाडू काजल नार्वेकर (एस. एम. सिंधु स्पोर्ट्स कुडाळ), तर पुरुष गटात अष्टपैलू खेळाडू परेश वालावलकर (जय गणेश पिंगुळी), उत्कृष्ट चढाई गणपत दाभोलकर (संघर्ष कोचरा), पकड राज सावंत (जय गणेश पिंगुळी) यांची निवड करण्यात आली. या सर्वांना प्रत्येकी पाचशे एक रुपये आणि स्मृतीचषक प्रदान करण्यात आला.स्पर्धेचे उद्घाटन जि. प. माजी अध्यक्ष सरोज परब यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरणप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मालवणचे माजी उपसभापती छोटू ठाकुर, पंचायत समिती माजी सदस्या गायत्री ठाकुर व महेश बागवे, बाबू आंगणे, पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, कृष्णा ढोलम, समीर म्हाडगूत, वेरली सरपंच धनंजय परब, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकुर, पूजा ठाकुर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मालोंडच्या सरपंच श्रीमती फणसगावकर, गार्गी चव्हाण, समीर ठाकुर, किशोर ठाकुर, ओमकार ठाकुर, नितीन हडकर, पुरुषोत्तम शिंगरे, जितेंद्र परब, अशोक बागवे, बाळ प्रकाश ठाकुर, नारायण ठाकुर, किशोर ठाकुर, अमित ठाकुर, सुभाष ठाकुर, महेश ठाकुर, राजा ठाकुर, रोहिदास ठाकुर, गुरु ठाकुर, सोमा ठाकुर, अक्षय ठाकुर, विष्णू ठाकुर, संकेत ठाकुर, कृष्णा चव्हाण, बापू चव्हाण, अजित चव्हाण, अनिल ठाकुर, समीर ठाकुर, कमलेश ठाकुर, रवी ठाकुर, रमेश ठाकुर, मोहन ठाकुर आणि नवतरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.महिला गटात आठ संघांनी, तर पुरुष गटात नऊ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी निरीक्षक तुषार साळगावकर,पंचप्रमुख प्रीतम वालावलकर आणि मुख्य पंच अमित गंगावणे, सागर पांगुळ, जयेश परब, हेमंत गावडे, प्रथमेश नाईक, शैलेश नाईक, सीताराम रेडकर, गौरव सांडव, महेश सावंत, विवेक नेवाळे, प्रथमेश आढाव, नितीन हडकर यांनी काम पाहिले.कबड्डीमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल मालवणचे सुपुत्र नितीन हडकर यांचा नवतरुण मित्रमंडळातर्फे दत्ता सामंत याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments
Post a Comment