गावागावात हवा कोणाची?गुलाल कोण उधळणार?
सावंतवाडी : तालुक्यात ग्रामपं चायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे . युतीबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही . तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , काँग्रेस , राष्ट्रवादीसह मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे . तालुक्यात ५२ ग्रामपंचा यत निवडणुका होऊ घातल्या असून येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे . यामध्ये माजगाव , कारीवडे , बांदा , माडखोल , भालावल , विलवडे , तिरवडे , चराठे , कलंबिस्त , मडुरा , नेमळे , नेतर्डे , निरवडे , सातार्डा आदी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे . या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मातब्बर मंडळींच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत . या ग्रामपंचायतींच्या होतायत निवडणुका या निवडणुकीत आजगाव , आंबेगाव , असनिये , बांदा , भालावल , भोमवाडी , चराठे , डेगवे , देवसू दाणोली , धाकोरे , गेळे , गुळदुवे , कलंबिस्त , कारीवडे , कास , कवठणी , केसरी , फणसवडे , किनळे , कोनशी दाभीळ , कुडतरकरटेंब सावरवाड , कुणकेरी , माडखोल , मडुरा , माजगाव , नाणोस ...