युवा चेहरा अर्णव स्वार निवडणूक लढवण्यास इच्छुक
बांदा:बांदा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.काही प्रभागात उमेदवार निश्चित झाले असून काही प्रभागात चाचपणी प्रत्येक पक्षाची सुरू आहे.आता यामध्ये इच्छुक उमेदवारांत सर्वात तरुण चेहरा म्हणून अर्णव अनय स्वार इच्छुक
असून प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली आहे.त्यामुळे प्रभाग दोन मध्ये आता उमेदवारीसाठी खरी चुरस पाहायला मिळणार आहे.
बांदा शहरात युवा क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या अर्णव स्वार याला युवा पिढीचा पाठींबा मिळत असून त्याच्या मित्र परिवारानेही अर्णव निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.त्यामुळे अर्णव स्वार निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने प्रभाग दोन मध्ये आता उमेदवारीसाठी खरी चुरस निर्माण होणार आहे.

Comments
Post a Comment