गावागावात हवा कोणाची?गुलाल कोण उधळणार?

 सावंतवाडी : तालुक्यात ग्रामपं चायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे . युतीबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही . तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , काँग्रेस , राष्ट्रवादीसह मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे . तालुक्यात ५२ ग्रामपंचा यत निवडणुका होऊ घातल्या असून येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे . यामध्ये माजगाव , कारीवडे , बांदा , माडखोल , भालावल , विलवडे , तिरवडे , चराठे , कलंबिस्त , मडुरा , नेमळे , नेतर्डे , निरवडे , सातार्डा आदी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे . या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मातब्बर मंडळींच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत .


या ग्रामपंचायतींच्या होतायत निवडणुका

 या निवडणुकीत आजगाव , आंबेगाव , असनिये , बांदा , भालावल , भोमवाडी , चराठे , डेगवे , देवसू दाणोली , धाकोरे , गेळे , गुळदुवे , कलंबिस्त , कारीवडे , कास , कवठणी , केसरी , फणसवडे , किनळे , कोनशी दाभीळ , कुडतरकरटेंब सावरवाड , कुणकेरी , माडखोल , मडुरा , माजगाव , नाणोस , नेमळे , नेतर्डे , न्हावेली , निगुडे , निरवडे , ओटवणे , ओवळीये , पाडलोस , पडवे - माजगाव , पारपोली , रोणापाल , सांगेली , सरमळे , सातार्डा , साटेली तर्फ सातार्डा , सातोसे , सातुळी , बावळाट , शेर्ले , शिरशिंगे , सोनुर्ली , तळवणे , तांबुळी , तिरोडा , वाफोली , वेर्ले , वेत्ये , विलवडे या ५२ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत . ग्रामपंचायत निवडणुकीत नामनि र्देशन पत्र २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार आहेत . या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे . या निवडणुकीचे मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे .

अस्तित्वाची लढाई...

या निवडणुकीत काँग्रेस , शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी करून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे . तसेच भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट युती करून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे . मात्र , भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे . या निवडणुकीसाठी उमेदवारी चाचपणी सुरू असून ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष रिंगणात नसले तरी पॅनल उभे करून राजकीय पक्ष लढत देणार आहेत . विद्यमान आमदार , शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या निवडणुका बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान असणार आहे . तर भाजपला सुद्धा ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे कडव आव्हान आहे . त्यात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडी करीत बलाढ्य विरोधकांना रोखण्याचे आव्हान असून खरेदी - विक्री संघात युतीच्या ताकदीसमोर भुईसपाट झालेल्या या तिन्ही पक्षांचे तालुक्यातील भवितव्य ग्रामपंचायतीत ठरणार आहे . युती न झाल्यास भाजप विरुद्ध दीपक केसरकर अर्थात बाळासाहेबांची शिवसेना असा थेट संघर्ष पाहायला मिळेल . दरम्यान , खरेदी - विक्री संघातील मैत्री कायम राहील असा दावा नेत्यांनी या आधी केल्याने भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे , पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे