महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी वाजता वेंगुर्ले येथील भाजप कार्यालयात तालुक्यातील १० कर्तृत्वान महिलांचा सन्मान भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व अॅड. सुपमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महीला ता.अध्यक्षा सुजाता पडवळ, शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, ता. सरचिटणीस पपु परब, प्रार्थना हळदणकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, आकांक्षा परब, समिधा कुडाळकर, हसीनाबेन मकानदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.<br>यावेळी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर म्हणाल्या कि महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करतानाच वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुल्यांच्या गौरवात भर घालणाऱ्या निवडक दहा महिलांचा सन्मान करून वेंगुर्लात ज...