पोलीस पाटील हा महत्वाचा दुवा...

 आचरा:दोन दिवसांपूर्वी चंदगड जि. कोल्हापूर येथील पोवाची वाडी मधील पोलीस पाटलाचा झालेल्या खून प्रकरणाच्या अनुषंगाने काल दुपारच्या सत्रात बेळणे चेक पोस्ट आचरा येथे आचरा पोलिस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील यांची संयुक्तिकरित्या बैठक आयोजित करून, पोलीस पाटील हे शासन व पोलीस खात्याचा खालच्या टप्प्यातील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा असून पोलीस पाटील हे गावातील एखादी संवेदनशील माहिती देवाणघेवाण करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी व पोलीस ठाणे कडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात चर्चा करून सर्व पोलीस पाटलांचे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल वाढवण्यात आले.


तसेच हिवाळे गावचे पोलीस पाटील श्री. विरेंद्र कदम हे कायमस्वरूपी सतर्क राहून पोलीस ठाणेस त्वरित माहिती देत असल्याकारणाने गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न झाल्याने त्यांचा आचरा पोलीस ठाणे मार्फत सत्कार करण्यात आला. तसेच सदर मीटिंग वेळी गोठणे पोलीस पाटील महेंद्र तळवडेकर व असगणी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी पोलीस पाटील म्हणून गावात कामकरीत असताना गावांमध्ये त्यांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणींबाबत प्रभारी अधिकारी श्री आनिल व्हटकर यांच्या सोबत मनमोकळेपणाने चर्चा केली पोलीस पाटील यांना आचरा पोलीस ठाणे येथे येण्याकरिता होणारा गाडी खर्च लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी व्हटकर साहेब यांनी बेळणे आऊट पोस्ट मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी मीटिंग घेण्याबाबत येईल असे सांगितले तसेच पोलीस ठाण्यातील नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गाव भेटी दरम्यान पोलीस पाटील यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल ग्रामस्थांसमोर सत्कार करून त्यांचा मानसन्मान वाढवण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. सदर वेळी आचरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते तसेच पोलीस ठाणे मार्फत पोलीस अंमलदार अक्षय धेंडे व अनिकेत सावंत ही उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे