डॉ.प्रदीप हळदवणेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार

 सावंतवाडी : एकमेका देऊ आधार , आपणच आपला उद्धार " या उद्देशाने कार्य करत असलेल्या हुतात्मा अपंग बहुउद्दे शीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांचेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार २०२३ यावर्षी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ . प्रदीप हळदवणेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले . करू सुनील संस्थेचे अध्यक्ष डॉ . फडतरे हे अंध असून देखील समाजातील अंध , अपंग व गरजू लोकांसाठी समाजसेवेचे काम करत आहे .


अश्या संस्थेकडून सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींच्याकामाचे कौतुक व्हावे आणि त्यांच्या हातून समाजासाठी भविष्यात देखील सकारात्मक काम व्हावे या उद्देशाने सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मध्ये ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल तसेच सन २०१६ ते २०१८ या कालावधीत डॉ . प्रदीप हळदवणेकर यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सहयोगी संशोधन संचालक म्हणून तसेच २०१८ ते आजतागायत उद्या तसेच २०१८ ते आजतागायत उद्या - नविद्या महाविद्यालय मुळदे येथे सहयोगी अधिष्ठाता या पदावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . • राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . रवळनाथ मंदिर ओरोस येथे झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार देऊन डॉ . प्रदीप हळदवणेकर यांना सन्मानित करण्यात आले . याबद्दल सर्व स्तरातून डॉ . हळदवणेकर यांचे कौतुक होत आहे .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे