सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकणासाठी अर्चना घारे यांचे पवारांना साकडे

 येथील रेल्वे स्टेशनचे रखडलेले काम सुरु होण्याबरोबर त्याचे विस्तारीकरण लवकरात लवकर व्हावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिल्ली येथे खासदार शरद पवार यांची भेट घेत निवेदन दिले आपण या प्रश्नात स्वतः जातीने लक्ष घालून सगळ्या त मोठा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करेल असे आश्वासन यावेळी श्री पवार यांनी सौ. घारे यांना दिले.


सौ घरे परब यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, तळ कोकणातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाची अवस्था केवळ शोभेची वास्तू असे झाले आहे. रेल्वे टर्मिनसचे बऱ्याच वर्षापासून रखडले काम आणि त्यामुळे आवश्यक असणाऱ्या रेल्वे गाड्यांना येथे थांबा मिळत नसल्याने सावंतवाडीतील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वेंगुर्ला व सावंतवाडी या दोन्ही तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांवर मोठ्‌या प्रमाणात पर्यटक येत असतात या पर्यटकांना रेल्वे प्रवासाची सुविधा नसल्याने पर्यटक येण्याचे प्रमाण देखील गेल्या काही वर्षात कमी होत आहे.


२४ जून २०१६ रोजी सावंतवाडी टर्मिनसचे उद्घाटन झाले. टर्मिनस फेज वन च्या कामाची सुरुवात व काम संपूर्ण होण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे काम लवकर पूर्णत्वास जाऊ शकले. फेज टू मध्ये सावंतवाडी टर्मिनसचे काम गेली ५-६ वर्षे बंदच आहे. मध्ये कोराना काळामुळे काम बंद राहीले. पण आजतागायत हे काम बंदच राहिले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास आणि जास्तीत जास्त गाड्यांना थांबा मिळाल्यास सावंतवाडीकरांचे मोठे स्वप्न पूर्ण होईल.

सध्या सावंतवाडी स्टेशनवर रोजच्या ९ व आठवड्याला धावणा-या ४-५ अशाच रेल्वे गाड्या थांबतात. यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रवासी वर्गाची खूप मोठी गैरसोय होते. मुंबईला जायचे म्हटले तर सावंतवाडी स्टेशनवर ५-६ गाड्यांचेच पर्याय प्रवाशांना मिळतात. त्यातील अर्धे सिट हे रिझर्व कोट्यांकडे असल्यामुळे जनरल कोट्यांमध्ये तिकीट मिळणे कठीण होऊन बसते जवळच्या तालुक्यांतील स्टेशनवर किमान २५-३० गाड्या दिवसाला थांबवल्या जातात. यामुळे ना इलाजने तेथून रेल्वेचा पर्याय स्वीकारावा लागतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व सावंतवाडीचा वेगाने होणारा विकास बघता ज्यादा रेल्वेगाड्यांना थांबा मिळाल्यास नक्कीच उपयोगी ठरेल. त्यासाठी येथे रेल्वे स्टेशनचे रखडत पडलेले काम सुरू होण्यावर व त्याचा विस्तार आहे होणे गरजेचे आहे त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशो मागणी केली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे