प्रा. निरंजन आरोंदेकर सेट परीक्षा उत्तीर्ण
सावंतवाडी:-येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सहाय्यक प्राध्यापक प्रा. निरंजन आरोंदेकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 26 मार्च 2023 रोजी घेतलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. प्रा निरंजन आरोंदेकर हे गोगटे वाळके महाविद्यालयात दोन वर्षे इंग्रजी विभागात कार्यरत आहेत.
महाविद्यालयाच्या पाडगावकर रिसर्च सेंटरने या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा आपल्याला लाभ झाल्याचे निरंजन आरोंदेकर यांनी सांगितले. ही परीक्षा ते पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. शिवाजी विद्यापीठाची एम. ए. पदवी विशेष गुणवत्ता यादीतून उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद काजरेकर, प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment