इन्सुली सातजांभळ येथे कारला झाला अपघात
मुंबई – गोवा जुन्या महामार्गावर इन्सुली सातजांभळ देवस्थान येथे मुंबईहून गोव्याकडे जाणार्या कारचालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात चालकाची पत्नी खुशबू ठाकूर (३४) व मुलगा आर्यन हे जखमी झाले. माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर व इन्सुलीतील रिक्षा व्यवसायिक अनिल नार्वेकर यांनी रिक्षातून जखमींना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणले.
खुशबू ठाकूर यांच्या डोक्याला तर आर्यनच्या डोक्यासह कानाला दुखापत झाली. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना गुरुनाथ पेडणेकर यांनी चालक हेमंत वागळे यांच्या सोबत रुग्णवाहिकेतून गोवा बांबोळी येथे नेले. बांबोळी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. चालकाला डुलकी आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटून अपघात झाला. मुंबईहून ते पर्यटनासाठी गोव्यात जात होते. सावंतवाडी रुग्णालयातील कारभारा बाबत माजी आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.

Comments
Post a Comment