बोडदे येथील विहीर कोसळल्याने ऐन पावसाळ्यात पाण्यापासून वंचित
गेल्या काही वर्षांपासून बोडदे आंबेडकरनगर वाडीतील ग्रामस्थ यांना पाणी पुरवठा करणारी या ठिकाणी असलेली सार्वजनिक विहीर नुकत्याच झालेल्या पावसामुळे सोमवारी विहीर कोसळली. विहिरीच्या बाजूला तडे गेले. यामुळे कुणी महिला पाणी भरायला गेल्या नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विहीर गायब होऊन मोठा गोलाकार खड्डा पडला आहे. यामुळे वाडीतील ग्रामस्थांना पावसाळ्यात पाण्यापासून वंचित राहाण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीस वर्षांपासून ही विहीर दुरुस्ती करावी यासाठी जमीन देण्यास तयार आहे. असे सांगून देखील ग्राम पंचायत लोकप्रतिनिधी यांनी दूर्लक्ष केले आहे, या वाडीतील लोकांवर जाणून बुजून अन्याय केला जात आहे. सोमवारी विहीर कोसळली याची कल्पना देवून देखील विहिरीच्या सभोवतालच्या भागात सुरक्षेतेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाही असे येथील ग्रामस्थ चंद्रकांत जाधव यांनी सांगून वाडीतील ग्रामस्थांना न्याय
मिळाला नाही. पर्यायी पाणी व्यवस्था न केल्यास प्रशासनाच्या विरोधात आत्मदहन करण्याचा इशारा चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे. बोडदे आंबेडकर नगर येथील लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी -ग्रामपंचायत सदस्य यांना या वाडीतील समस्या याचा विसर पडला आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी ही विहीर बांधली होती जिल्हा परिषद कडून दुरुस्ती खर्च देखील घालण्यात आला होता. या विहिरीच्या पाण्याचा वापर येथील ग्रामस्थ करत होते. ही विहीर ग्रामपंचायत यांनी ताब्यात घ्यावी यासाठी दोन गुंठे जमीन बक्षीस पात्र करुन देण्यास तयार आहे. असे चंद्रकांत जाधव गेली तीस वर्षे सांगत आहेत. पण ग्रामपंचायत यांनी लक्ष दिले नाही. या ठिकाणी पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही त्यामुळे हाल होत आहेत असे. जाधव यांनी सांगितले.
बोडदे ग्रामपंचायत यांनी आंबेडकर नगर येथील विहीर ताब्यात घेऊन खर्च घालून दुरुस्ती केली असती तर आज विहीर कोसळली नसती असे चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. विहीर कोसळली याची माहिती ग्रामपंचायत सरपंच सदस्य इतरांना दिली पण सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी कुणी फिरकले नाही. लोकप्रतिनिधी यांनी बोडदे आंबेडकर नगर येथील ग्रामस्थ यांच्यावर जाणून बुजून अन्याय करत आहेत असा आरोप चंद्रकांत जाधव यांनी केला आहे. ज़र या ठिकाणी आज जीवीत हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. बोडदे आंबेडकर नगर येथील विहीर कोसळली आहे त्यामुळे या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शिवाय विहिरीच्या ठिकाणी कोणी आत पडू नये यासाठी सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था न केल्यास तसेच विहीर ग्रामपंचायत यांनी ताब्यात घेऊन बांधकाम करावे अन्यथा २० जूलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा चंद्रकांत जाधव याने दिला आहे.

Comments
Post a Comment