सावंतवाडी रक्तपेढीत अखेर तंत्रज्ञाची नेमणूक

 सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी एका महिला तंत्रज्ञानाच्या जीवावर सूरु होती. वारंवार मागणी करूनही पद भरली जात नसल्याने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी काळी फीत बांधून निषेध आंदोलन केलं.


तर पद न भरल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक बी.एस. नागरगोजे यांनी तात्काळ तंत्रज्ञानाची नियुक्ती केली. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रक्तपेढी विभागातील कामकाजाच्यादृष्टीने महिला रुग्णालय कुडाळ येथे कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीम.सुप्रिया सातोसकर यांना पुढील आदेश होईपर्यंत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रक्तपेढी विभागात कामकाज करण्यासाठी पाठविण्यात यावे असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी कुडाळ महिला रूग्णालाच्या वैद्यकीय अधिक्षकांना दिलेत. <br>वैद्यकीय अधिक्षकांनी तात्काळ रक्तपेढीसाठी तंत्रज्ञ दिल्यान युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील आत्मदहन आंदोलन रद्द केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे