नियमबाह्य काम केल्यास गप्प बसणार नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात बी . एस . एन . एलच्या टॉवर्सची उभारणी सुरू आहे . मालवण तालुक्यात महान व अन्य गावात बीएसएनएलचा टॉवर्ससाठी सर्व्हे झाला . ग्रामपंचयत व प्रशासन स्तरावर जागा निश्चित झाली . मात्र , निश्चित केलेल्या जागी टॉवर उभारणी न करता विनायक राऊत आणि वैभव नाईक अन्य ठिकाणी टॉवर उभारणी करण्याचा प्रयत्न आहेत . त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने असे झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही , असा सज्जड इशारा भाजपचे कुडाळ मालवण मतदारसंघ प्रमुख निलेश राणे यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना दिला .
सावंतवाडी येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयात त्यांनी धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले . बीएसएनएल निकषानुसार व मध्यवर्ती स्वरूपातील ज्या जागा मंजूर झाल्या त्याच जागीटॉवर्स झाले पाहिजेत . सोमवार पर्यंत सर्व दुरुस्त्या व्हायला हव्यात . नियमात आहे तेच व्हावे ही आमची भूमिका आहे आम्ही नियमाच्या बाहेर मागत नाही . मात्र , लोकेशन बदलणे हे चुकीचे आहे . विनायक राउत जेथे जेथे उद्घाटन करतात ते टॉवर्स चालू होत नाही . याचा अभ्यास करा . ते नियमाच्या बाहेर जाऊन टॉवर्सच्या जागा बदलायला सांगत आहेत . पण आम्ही नियमात आहे तेच सांगत आहोत . त्यामुळे दिलेल्या जागेवरच टॉवर्स झाले पाहिजेत , असा आक्रमक पवित्रा निलेश राणे यांनी घेतला . केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या टॉवरचे श्रेय खासदार राऊत व आमदार वैभव नाईक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र अधिकारी वर्गाने कुठल्याही दडपणाखाली येण्याची गरज नाही . थांबलेल्या टॉवर्सची कामे तत्काळ सुरु करा . असेही यावेळी सांगण्यात आले . यावेळी उपस्थित माजी सभापती सुधीर साळसकर व महान गावातील ग्रामस्थानीही आक्रमन भूमिका मांडली . अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करावे . अधिकारी वर्गाच्या कारभारामुळेच गावात वाद निर्माण होत आहेत . त्यामुळे गावाने सुचवलेल्या व सर्व्हे मध्ये निश्चित करण्यात आलेल्या जागीच टॉवर उभारणी व्हावी , अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली . यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस तथा कामगार नेते अशोक सावंत , माजी नगराध्यक्ष संजू परब , माजी नगरसेवक आनंद नेवगी माजी सभापती सुधीर साळसकर , आनंद शिरवलकर , महान गावचे उपसरपंच अजित राणे , युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित , महान ग्रा . प . सदस्य प्रसाद जाधव , दिलीप भालेकर , बांदा उपसरपंच जावेद खतिब , ज्ञानेश्वर सावंत , गुरू सावंत ,ज्ञानेश्वर पाटकर , साईनाथ जामदार , गुरू मठकर , सागर शिंदे , अशोक जाधव , संग्राम साळसकर , मंगेश साळसकर , रवींद्र साळसकर , सुरेश घाडी , अजय तावडे , संतोष शिंदे , मदन घाडी , अनिल सावंत , विनोद सावंत आदी उपस्थित होते . दरम्यान , भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरची उभारणी जिल्ह्याभरात सुरु आहे . संबंधित ठिकाणी टॉवर उभारले जात असताना मंजुरीपूर्व सर्व्हे वगळून अन्य ठिकाणी टॉवर उभारणी केली जात असल्याच निदर्शनास येत आहे . विशेषतः कुडाळ मालवण तालुक्यातील बीएसएनएल टॉवरची कामे हेतुपुरस्सर थांबविल्याचे किंवा झालेला सर्व्हे व प्रत्यक्षात होणारे काम यात तफावत आढळत आहे . कुडाळ व मालवण तालुक्यात आपल्या ज्या बीएसएनएल टॉवरची उभारणी वर्षभरापूर्वी झालेली आहे ते अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत . त्या शिवाय नवीन मंजुर झालेल्या टॉवरच्या कामांनाही अद्याप सुरुवात नाही . आपल्या अश्या कारभारामुळे कुडाळ व मालवण तालुक्याचा ग्रामीण भाग संपर्काबाहेर असून सर्वसामान्यांना नाहक समस्यांचा सामना करावा लागत आहे . तरी सद्यस्थितीत उभारणी पूर्ण झालेले टॉवर त्वरित कार्यान्वित करावेत . या सोबतच नव्याने मंजूर झालेले बीएसएनएल टॉवर देखील आपल्या यंत्रणेमार्फत ज्या ठिकाणचा सर्व्हे आहे त्याच ठिकाणी उभारणी वरुन कार्यान्वित करावेत , अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे .

Comments
Post a Comment