जिल्ह्यात मालवण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
सिंधुदुर्गनगरी, दि. २८: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.९ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२८ मि.मी. पाऊस झाला आहे.<br>तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड-९८.०४ (२९३.४), मालवण-११५.० (३४४.४), सावंतवाडी-१०७.५ (४३१), वेंगुर्ला-७३.०(२८४.७),
कणकवली-६०.०७(२८४.३), कुडाळ-८९.५(३४२.१), वैभववाडी-७३.०(२९३.७), दोडामार्ग-७४.८(३६०.८) असा पाऊस झाला आहे.

Comments
Post a Comment