सावंतवाडीत चिमुकल्यांची वारी ठरली लक्षवेधी

 सावंतवाडी: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा अनोखा होता. हा सोहळा घडला शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक ६६ च्या तीन वर्षाच्या चिमुकल्यामुळे !<br>आषाढी एकादशीच्या निमित्ताने या अंगणवाडी मधील चिमुकल्याने विठ्ठल भेटीचा सोहळा साकार केला.यानिमित्ताने यांच्या या वारीमध्ये वारकरी बनले अंगणवाडीतीलच चिमुकली बालके.आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या भूमिकेत सुगम करमळकर तो रखुमाईची भूमिका स्निग्धा प्रभू हिने साकारली.<br>शहरातील जिल्हा परिषद शाळा नं.२ मधील अंगणवाडीतील या विठ्ठल दर्शनाच्या वारीत छोटी छोटी बालके वारकरी ठरली. माठेवाडा येथून चालत या बालकानी संस्थानकालीन श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये ग्यानबा तुकारामचा गजर करत साक्षात विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले त्यामुळे विठ्ठलाच्या भेटीला विठ्ठल आला असा काहीसा नजारा पाहायला मिळाला.


यामध्ये अंगणवाडी सेविका अनुराधा पवार अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर यांच्यासह सपना विरोडकर, स्वानंदी निवगी, स्वरा प्रभू, नेहा काष्टे,विनिता करमरकर,भक्ती नाईक, पूजा मुंज, जयमाला केसरकर हे पालकही सहभागी झाले होते.तर या विठुरायाच्या वारीचे वारकरी रिद्धीमा, गंधार, रोहित, भार्गवी, शिवण्या, शुभ्रा,वेदांश,राजवीर,रुद्र, शुभ्रा, तनया, योगिता, विशाखा, आदी छोटी छोटी बालके डोकीवर टोपी, पारंपारिक वेषात  सहभागी झाली होती.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे