दाभोली येथील पाण्याचा मार्ग झाला मोकळा

 वेंगुर्ले,ता. ३०: तालुक्यातील दाभोली येथील समुद्र किनाऱ्यावर वाळूचा गाळ साचल्याने तेथील मोबारातील खाडीच्या पाण्याला समुद्रात जाण्यासाठी वाट मिळत नव्हती. त्यामुळे हे पाणी शेजारील रस्त्यावर आले होते तसेच याठिकाणी असणाऱ्या माडये कुटुंबियांच्या घरात पाणी जाण्याचा धोकाही निर्माण झाला होता. दरम्यान याची माहिती मिळताच शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ दखल घेत जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.


दाभोली येथे मोबारातील खाडीचे पाणी समुद्रात जाण्यासाठी वाळूचा गाळ साचल्याने वाट मिळत नव्हती. गेल्यावर्षी असेच पाणी साचल्याने येथील रहिवासी संजय माडये व बाळा माडये यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते. यावेळी सुद्धा या मोबारातील पाण्याला समुद्रात जाण्यासाठी गाळ साचल्याने वाट नव्हती परिणामी पाणी शेजारील रस्त्यावर आले होते. तसेच माडये कुटुंबियांच्या घरात पुन्हा पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच उपसरपंच फिन्सुअनिता फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ, सामाजिक कार्यकर्ते नरेश बोवलेकर, माजी प स सदस्य समाधान बांधवलकर यांनी त्याठिकाणी पाहणीकरून तात्काळ याबाबत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या पाठपुराव्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे समुद्राचा गाळ काढून वाट करून देण्याची मागणी केली होती. दरम्यान याची दीपक केसरकर यांनी तात्काळ दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने या पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे पुढील धोका टळला. याबाबत दाभोली ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकारी व मंत्री केसरकर यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे