तुळस गावात एटीएम सुरू करा
सिंधुदुर्ग जिल्हा बँक हि खया अर्थाने सर्वसामान्यांची बँक आणि विशेषतः शेतकयांची बँक म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे या बँकेच्या वतीने तुळस गावात बँकेचा विस्तार कक्ष आणि एटीएम सूर करण्याची मागणी तुळस गावातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता पडवळ यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तुळस गावच्या विकासाच्या दृष्टीने विविध सुविधा गावात उपलब्ध आहेत. परंतु अद्याप बँक सेवा गावात उपलब्ध नाही. तुळस गावात शेतकरी वर्ग तसेच नोकरदार,व्यावसायिक,उद्योजक,दुकानदार,किरकोळ व्यापारी, महिला बचत गट,रिक्षा व्यावसायिक,सुतारकाम,कुंभारकाम आदींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या वर्गाना तसेच सर्व सामान्य जनतेला आपल्या दैनंदिन बँक व्यवहारासाठी होडावडा किंवा वेंगुर्ला शहराचा आधार घ्यावा लागतो. यात सर्व सामान्य माणसाचा वेळ आणि पैसा खर्ची पडतो.तरी या सर्वाचा विचार करून आपण तुळस गावात आपल्या बँकेचा विस्तार कक्ष तसेच ए.टि.एम.सुविधा सुरू करुन तुळस गावासह नजिकच्या अणसूर,पाल,मातोंड आदी गावातील जनतेची बँकिंग गैरसोय दूर करावी अशी मागणी सौ पडवळ यांनी केली आहे.यावेळी तुळस गावातील भक्ती आरावंदेकर,समृद्धी तुळसकर, अंगारीका तुळसकर, विद्या आंगचेकर, संतोष शेटकर, सुनिल तुळसकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment