बांदा शहरासाठी कचरा गाडी मिळावी:काणेकर
सावंतवाडी: बांदा बाजारपेठ आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता बांदा ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी उपलब्ध व्हावी यासाठी निधी द्यावा अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना(ऊबाठा) बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर
यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.<br>साईप्रसाद काणेकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची नुकतीच भेट घेत ही मागणी केली आहे.बांदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सद्या वापरात असलेली कचरा गाडी वाढत्या कचऱ्यामुळे अपुरी पडत आहे.या पार्श्वभूमीवर बांद्यासाठी कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

Comments
Post a Comment