उद्या दोडामार्ग तालुक्यात खा.सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस होणार साजरा
दोडामार्ग : संसदरत्न खासदार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व व दशावतार कलाकार समिती , दोडामार्ग द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे - परब यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . शुक्रवारी ३० जून रोजी सायं . ६ वाजता दशावतार कलाकार समिती , दोडामार्ग यातील कलाकारांचा सत्कार सोहळा तसेच इयत्ता दहावी , बारावी , उच्च शिक्षण , पदवी प्राप्त केलेल्या दशावतार कलाकार यांच्यामुलांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे . इयत्ता दहावी , बारावी परीक्षेत सन २०२३ या वर्षी उत्तीर्ण होऊन तालुक्यात अनुक्रमे प्रथम ,द्वितीय आणि कौशल्य , भाषा प्रभुत्व , उत्कृष्ट रंगभूषा तृतीय क्रमांक आणि वेशभूषा या कलागुणांसह प्राप्त विद्यार्थ्यांचा लोकपरंपरेचा वारसा अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल आणि दशावतार चळवळीतील आपल्या अमूल्य योगदानाबद्दल सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणची ओळख गुणगौरव केला जाणार आहे . सायं . ७ वाजता दोडामार्ग तालुक्यातील निवडक नामवंत असणाऱ्या दशावतार कलाकारांच्या दशावतारी कार्याचा सन्मानपूर्वक गौरव
करणार कलाकारांचा आहोत . यासाठी या कार्यक्रमाचे संयुक्त पौराणिक आयोजन करण्यात आल्याचे अर्चना दशावतारी घारेंनी सांगितले . नाटय प्रयोग ' सुवर्ण मुद्रिका ' हा नाट्यप्रयोग श्री देव खंडोबा सभागृह , सरगवे पुनर्वसन येथे होणार आहे . दशावतार क्षेत्रातील अभिनय दरम्यान , ३० जून रोजी होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी , कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी केले आहे .

Comments
Post a Comment