बांदा केंद्रशाळेच्या उपक्रमशील संस्कारक्षम शिक्षिका सौ.सरोज नाईक
" गुरु ईश्वर तात माय , गुरू वीण जगी थोर काय " या गुरूच्या महती व्यक्त करणाऱ्या पंक्ती बांदा केंद्रशाळेच्या उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षिका सरोज शरद नाईक यांना संत लागू होतात . लहान मुल म्हणजे मातीचा गोळा , त्याला आकार द्यावा , राशी मूर्ती घडते , असे म्हटले जाते . हेच काम संस्कारक्षम शिक्षिका म्हणून बांदा केंद्रशाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक यांनी केले . ज्ञानदान करीत असताना विद्याथ्यामध्ये सद्गुणांची रुजवणूक करणे शिक्षकांचा खरा धर्म आहे . केवळ मुलांना चांगले गुण मिळाले की आपले कर्तव्य संपले असे नाही तर आपल्या हावाखाली शिकलेले विद्यार्थी प्रेमाने , प्रामाणिकपणे व नीतीमत्तेने समाजसेवा करतील , असे सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्याचे कार्य नाईक यांनी केले आहे . त्या मूळच्या सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावच्या , त्यांचा विवाह बिबवणे ( ता . कुडाळ ) या गावातील बांदा नवभारत शिक्षण संस्थेत ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक असलेल्या शरद नाईक यांच्याबरोबर झाला . सरोज नाईक यांचा जन्म विलवडेतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला . त्यांनी आजगाव येथील अध्यापक विद्यालयातून डी.एड. ची पदवी मिळविल्यानंतर आपल्या नोकरीची सुरुवात हळदीचे नेरूर ( ता . कुडाळ ) क्रमांक ५ या शाळेत केली . त्यानंतर डेगवे मोयझर ( ता . सावंतवाडी ) , मोरगाव गावठाण ( ता . दोडामार्ग ) व त्यानंतर साळगाव क्रमांक २ या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक व शेवटी बांदा क्रमांक १ केंद्रशाळा अशाप्रकारे एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले .
शिक्षकी पेशा सुरू केल्यानंतर या गावात शाळा त्याच गावात वास्तव्य करून राहिल्यामुळे खेड्यातील होतकरू विद्यार्थ्याना नाईक उभयतांनी अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले . त्यामुळे पालक , ग्रामस्थ , विद्याथ्यांशी आपुलकीचे जिल्हाळ्याने संबंध जोपासले . सामाजिक बांधिलकी जपणूक करण्यात समस्त कुटुंबीय प्रभागी राहिले . त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून शालेय अध्यापनातून शिक्षक म्हणून कार्य करत असताना शालेय जीवनामध्ये ला , क्रीडा , सांस्कृतिक , वाचन लेखन व विज्ञान प्रदर्शन , स्काऊट गाईड , शिष्यवृत्ती , नवोदय व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पडविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे .
बांदा क्रमांक १ केंद्र शाळेमध्ये अध्यापनाचे काम करत असताना शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक दर्जा निर्माण करून नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविले . नाईक यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्यपातळीवर पोहोचले आहेत . त्यांनी बांदा शाळेत केलेल्या कार्याचे कधीही विस्मरण होणार नाही . बांदा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापक म्हणून जवळपास चार वर्षे यशस्वीपणे धुरा त्यांनी सांभाळली असून शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत . कोरोना काही विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारचे ऑनलाईन उपक्रम चालू ठेवून ज्ञानदान सुरू ठेवले होते . शाळेविषयी पालक , ग्रामस्थांचा जनसंपर्क मिळवण्यास त्यांचा विशेष हातखंडा होता . पाच वर्षांच्या कालावधीत सहकारी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बांदा केंद्र शाळेसाठी १० लाखांहून अधिक लोकसहभाग मिळवून शाळेचा कायापालट करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत .
चांदा केंद्रशाळेच्या भौतिक सुविधा मिळवून देण्यासाठी स्वखचांतूनही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत . शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी सतत त्यांचा हात पुढे असतो . सरोज नाईक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून विविध संघटना व संस्थेच्या वतीने वेळोवेळी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे . त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्गजिल्हा भारत स्काउट गाउंड या संस्थेवर जिल्हा कार्यकारिणी मंडळावर त्यांची नियुक्तीही केली आहे . सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने राबविलेल्या उत्कर्षा उपक्रमांतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे . त्यांचे वडील राजाराम दळवी हे प्रगतशील शेतकरी होते . पती शरद नाईक हे बांदा कॉलेजमधून फेब्रुवारी २०२३ मध्ये निवृत्त झाले असून त्यांचा मुलगा निशिष हा वी . एस्सी . आयटी व मुलगी निकिता ही इंजिनिअर जावई अक्षय शिंद कंपनीत व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत . सध्या बांदा येथे नोकरी निमित्ताने वास्तवास असलेल्या नाईक परिवाराचा मूळ विणे गावी मोठा गोतावळा असून विविध कार्यक्रमाप्रसंगी सर्व कुटुंबीय एकत्रित येत असतात . नाईक या आज निवृत्त होत असल्या तरी त्यांच्या सुसंस्कारित , प्रेमळ स्वभावाचे , हसऱ्या चेहऱ्याचे , उदात्त मनाचे स्मरण नेहमी होत राहील . त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पुढील आयुष्य सुखी समृद्धी व भरभराटीचे जावो हिच सदिच्छा .



Comments
Post a Comment