पावसाळ्यानंतर दर्जा पाहून बिले काढावीत:रुपेश राऊळ

 सावंतवाडी तालुक्यात १५ मे नंतर सुरु करण्यात आलेली सर्वच खडीकरण रस्त्याच्या तसेच डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून , संबंधित कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून चोरी , लबाडीसारखे प्रकार होत आहेत . त्यामुळे या रस्त्याच्या कामाची बिले अडवून ती पावसाळ्यानंतर कामाचा दर्जा पाहून काढावीत , अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे .


सावंतवाडी शिवसेना संपर्क आयोजित पत्रकार कार्यालयात परिषदेत रुपेश राऊळ बोलत होते . बाळा गावडे , चंद्रकांत कासार , सरपंच गुणाजी गावडे , आबा सावंत , आबा धुरी , योगेश गावडे , अशोक परब आदी उपस्थित होते . राऊळ म्हणाले , पालकमंत्र्याकडे बांधकाम खाते आहे . आता पावसाळा जवळ आलाअसताना ऐन मान्सूनच्या तोंडावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू आहेत . एकीकडे १५ मे नंतर रस्त्याची कामे न करण्याचा नियम असल्याचे प्रशासन सांगते तर दुसरीकडे मे महिन्याची अखेरी आली तरी डांबरीकरणाची कामे सुरू आहेत . ही सगळी कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत . त्यामुळे नेमळे , आजगाव , चौकुळ आणि अन्य गावांमध्ये ग्रामस्थांकडून अशी कमे अडविली जातं आहेत . ही कामे का अडवली जात आहेत ? याची चौकशी बांधकाममंत्र्यांनी करावी . एकीकडे नियमावर बोट ठेवता आणि दुसरीकडे नियम धाब्यावर बसवूनन कामे रेटतात , हे काय सुरू आहे ? असा सवाल श्री . राऊळ यांनी केला . स्थानिक आमदार , पालकमंत्री आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा गवगवा करीत आहेत त्यांनी इथे लक्ष द्यावा ; अन्यथा हा निधी मातीत जाईल , अशी टीका राऊळ यांनी केली . पालकमंत्र्यांनी बांधकामविभागाचे अधिकारी व  पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील सर्व विकासकामे दर्जेदार होतील यासाठी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी . अशी त्यांना विनंती आहे असे राऊळ म्हणाले . ज्या ठेकेदारांनी निकृष्ट कामे केली आहेत त्यांची बिले थांबवून ठेवावी व पावसाळ्यानंतर कामाचा दर्जा पाहून काढावीत , पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा निर्णय घ्यावा , असे आवाहन राऊळ यांनी केले . आपण लढवणार स्थानिक आमदाराकडे मी आहे . सर्व निधी आपण एकट्यानेच आणला असे ते सांगत आहेत . जर असेल तर शहराचा विकास का खुंटला यांचे त्यांनी उत्तर द्यावे ना केसरकर खासदारकी असल्याच्या पुड्या सोडत आहेत मुळात ते आमदारकी देखील लढवणार नाहीत , या साऱ्या त्यांच्या वल्गना . आपली कारकीर्द संपली लक्षात आले आहे , अशी रुपेश राऊळ यांनी केली .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे