युवा रक्तदाता संघटनेमुळे महिलेचा रक्ताचा प्रश्न सुटला
सावंतवाडी : येथील डॉ.नवांगुळ यांच्या रूग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या मंजिरी कांबळी रा.वारखंड,गोवा या महिला रूग्णाला पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान AB+ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या पाच PCV तर दोन Whole Blood ची अत्यंत तातडीने आवश्यक्यता होती. गोवा बांबोळी रक्तपेढी मध्ये देखिल रक्ताचा तुटवडा असल्याचे सांगितले त्यामुळे शस्त्रक्रियेस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा रूग्णालय रक्तपेढी चे डॉ.अमित आवळे यांच्याशी संपर्क साधत ओरोस जिल्हा रूग्णालय रक्तपेढी येथे सावंतवाडी तून रक्तदाते पाठवून व्यवस्था केली.
यावेळी मयूरेश निब्रे, आकाश सासोलकर, शुभम गावडे, ज्ञानेश्वर पाटकर या सर्वांनी जिल्हा रुग्णालय ओरोस रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. त्यामुळे ही मोठी शस्त्रक्रिया गुरूवारी डॉ.राजेश नवांगूळ, सावंतवाडी यांच्या रूग्णालयामध्ये डॉ.आदेश पालयेकर करणार आहेत.या संपूर्ण रक्ताच्या आवश्यकतेदरम्यान श्री देव्या सुर्याजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.दात्यांचे व युवा रक्तदाता संघटनेचे तसेच जिल्हा रूग्णालय रक्तपेढी ओरोस या सर्वांचे आभार कांबळी कुटुंबीय,गोवा यांनी मानले आहेत.

Comments
Post a Comment