मोरजकर माय लेकरांचे घवघवीत यश
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसंस्कारच्या वतीने आयोजित "बुधभूषण" या राज्यस्तरीय स्पर्धेत बांदा येथे सौ. रीना निलेश मोरजकर यांनी खुल्या गटात पहिला तर नैतिक निलेश मोरजकर याने शालेय गटात द्वितीय क्रमांक मिळविला. मोरजकर माय लेकराच्या यशाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी देखील अनेक स्पर्धामध्ये त्यांनी सुवर्ण यश मिळविले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा व कर्नाटक राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज रचित "बुधभूषण" या ग्रंथातील कुठलाही एक श्लोक व त्याचा मराठीत अनुवाद असा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत खुल्या गटात रीना मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर शालेय गटात नैतिक मोरजकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १) याने द्वितीय क्रमांक मिळविला. तर वेशभूषा स्पर्धेत नैतिक याने चतुर्थ क्रमांक मिळविला. मोरजकर माय लेकराच्या यशाने बांदा शहरातून अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment