परफेक्ट अकॅडमी ओरोसची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम...
15 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण.
जेईई नीट या परीक्षांसाठी संपूर्ण कोकणात अग्रेसर मानला जाणाऱ्या परफेक्ट अकॅडमी चा बारावी स्टेट बोर्ड चा निकाल यंदाही उज्वल राहिला.
परफेक्ट अकॅडमी ओरोस येथून यंदा 30 विद्यार्थी, बारावी सायन्सच्या परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी तब्बल 15 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी विद्वत्ता वारंग हिने 88% टक्के गुण घेत प्रथम, कुमारी संजना सावंत आणि मानसी पाताडे यांनी 79 टक्के गुण घेत अकॅडमीतून द्वितीय येण्याचा मान पटकावला. तर रीया आंबेडकर आणि सोहम गावडे 77% गुण घेत तृतीय स्थानावर राहिले. श्रेया गावकर आणि अनुजा सावंत यांना 74 टक्के आणि 70 टक्के असे गुण मिळाले.
या आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे परफेक्ट अकॅडमी चे चेअरमन प्राध्यापक राजाराम परब यांनी विशेष कौतुक केले आहे.
सर्वसाधारणपणे नीट किंवा जेईई ची तयारी करताना, बारावीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो, असा विद्यार्थ्यांचा समज आहे. परंतु परफेक्ट अकॅडमी मध्ये या दोन्हीचा समतोल ठेवत विद्यार्थी दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवतात, पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
यावर्षी विज्ञान शाखेची ओव्हरऑल टक्केवारी विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसत आहे, तरीही परफेक्ट अकॅडमीच्या खालील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच स्तुत्य असल्याने समाजातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment