वेंगुर्ले येथे ३१ मे पासून निःशुल्क कुकरी वर्कशॉपचे आयोजन
कुडाळ,ता.२४: साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेंगुर्ले येथे निशुल्क “कुकरी वर्कशॉप”चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कोर्स ३१ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
बारावी हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, त्यानंतर पदवी परीक्षा द्यायची, नोकरी निवडायची की इतर व्यवसाय निवडायचे अशा संभ्रमावस्थेत विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट हा १००% नोकरीची हमी देणारा एक सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. या क्षेत्राशी तोंड ओळख व्हावी यासाठी लोकमान्य एज्युकेशन आणि जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स,साळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी येथे कुशल शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुकरी वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पिझ्झा, बर्गर, शोरमा, चायनीज, मॉकटेल्स चे विविध प्रकार शिकवण्यात आले. तसेच त्यांना नोट्स व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
हॉटेल्स मध्ये मिळणारे विविध प्रकार शिकण्याची संधी सावंतवाडी सारख्या शहरात मिळाली हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसत होता आणि त्यांनी तो व्यक्तही केला. उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांच्या खास आग्रहाखातर पुन्हा एकदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क कुकरी वर्कशॉप चे आयोजन वेंगुर्ले येथे दिनांक ३१ मे ला करण्यात आले आहे. तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कुकरी वर्कशॉपचा लाभ घ्यावा व आपले भविष्य सुखकर करण्याचा मार्ग निवडावा यासाठी लोकमान्य एज्युकेशनच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 7030938095 / 96, 9890945878 या नंबर वर संपर्क करावा

Comments
Post a Comment