कोलगाव येथील अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू
सावंतवाडी : सावंतवाडी शहराजवळील कोलगाव आयटीआय जवळ चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील रोहित रामचंद्र कळसुलकर (वय २० रा. माणगाव नाणेली) हा ठार झाला तर उत्तम उदय नेवगी ( वय २२ रा. नानेली माणगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की चारचाकी आकेरीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. तर दुचाकी सावंतवाडीहून माणगावच्या दिशेने जात होती. यावेळी कोलगाव आयटीआय जवळ दोघांची जोरदार धडक बसली. ही घटना घडतात तेथील स्थानिकांनी धाव घेतली. रोहित हा गंभीर जखमी झाला होता. दोघांनाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तो पर्यंत रोहित याची प्राणज्योत मावळली होती.

Comments
Post a Comment