सागर चव्हाण यांना दि प्राईड ऑफ इंडिया 'भास्कर अवॉर्ड २०२३' जाहीर

 महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ इंडिया ‘भास्कर अ‍ॅवॉर्ड २०२३ ‘ कोकणसाद लाइव्हचे संपादक सागर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. गोवा येथील टेक्नोक्रॅट व पर्यावरण लेखापरिक्षक जीवन जवारे, सांस्कृतिक क्षेत्रातील समाजसेवीका सौ.जयश्रीताई जाधव, गोवा येथील अमृतमहोत्सवी रियल ग्रुप ऑफ कंपनी, उत्तर प्रदेशचे खासदार संगमलाल गुप्ता, कोल्हापूर जिल्यातील प्रसिध्द उद्योजक प्रकाश मोहीते, अहमदनगरचे प्रसिध्द उद्योजक दापत्य स्वप्नील भूजबळ व सौ.पूजा भूजबळ यांचे सह गोवा आणि महाराष्ट्र येथील पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सागर दत्ताराम चव्हाण संपादक


दै.कोकणसाद, महेश रामगोंडा पाटील-उपसंपादक दै.लोकमत, विजय लाडू मलीक विशेष प्रतिनिधी दै.तरूण भारत, विजय डीसुझा उपसंपादक दै.टाईस ऑफ इंडिया, यशवंत बाबू पाटील सहायक वृत्त संपादक दै.गोमन्तक, तर साखळी गोवा येथील सामाजिक क्षेत्रातील गुरूप्रसाद (संजय) गणपत नाईक, उमेश पांडूरंग सरनाईक आदी मान्यवरांचा यंदाच्या नामांकनामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. अशी माहीती संस्थाध्यक्ष डॉ.राजीव लोहार यांनी दिली.रविवार २८ मे रोजी, रविंद्र भवन, साखळी-गोवा येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सदरील शानदार समारंभ सपन्न होत आहे. समारंभाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, पदमश्री विनायक खेडेकर उपस्थित राहाणार असून प्रमुख अथिती गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.डॉ.प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन, जल परिवहन, बंदर विकास राज्यमंत्री मा.श्रीपाद नाईक, गोवा माजी मुख्यमंत्रीे मा.दिगंबर कामत, यांच्या सह माजी केंद्रीय कायदामंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, गोवा कामगार नेते अ‍ॅड. अजितसिंह राणे, गोवा राज्य पत्रकार संघ (गुज) चे अध्यक्ष राजतिलक नाईक, पत्रकार अनिल पाटील, महिला विभागाच्या अध्यक्षा सौ.मनिषा लोहार आदि मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.



Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे