मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० ला सावंतवाडीत
सावंतवाडी,ता.२५: शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भूमिपूजनासाठी ३० तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीकरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील अन्य विकासकामांची भूमिपूजने करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. श्री केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

Comments
Post a Comment