प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडीत हृद्य सत्कार.

कुडाळ मालवणच्या नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांनी  महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आपल्या पुढील सेवेसाठी  भराडी मातेचे आशीर्वाद घेतले.

यावेळी आंगणेवाडी येथे आंगणे कुटुंबीयांच्या वतीने


आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाळा आगणे यांनी सर्वांचे  यथोचित स्वागत करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन श्रीमती ऐश्वर्या कळुसे यांचा हृदय सत्कार केला. यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाल्यात श्रीदेवी भराडी मातेचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठे असून लोकाभिमुख सेवा या जिल्ह्यात करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आज  आंगणे कुटुंबीयांचे हे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहे.

याबरोबर प्रथमच नूतन मंडळ अधिकारी झालेल्या श्रीमती एम एस चव्हाण यांचाही हृदय सत्कार आंगणे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला.

 यावेळी तलाठी  ए के देसाई, ग्रामसेवक युगल प्रभू देसाई, आंगणेवाडी विकास मंडळाचे सेक्रेटरी मधुकर आंगणे, बाबू आंगणे, अनंत आंगणे, चंद्रकांत आंगणे, सुरेश आगणे, सतीश आगणे, सुधाकर आगणे, रघुनाथ आंगणे, संदेश आ, श्री वराडकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी बाळा आंगणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .



.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे