बांदा विकास सोसायटीच्या सहकार कृषिभवन आणि सभागृहाचे उद्घाटन

  बांदा विकास सोसायटीच्या (कै.) माधव हरी अळवणी सभागृहाच्या उदघाट्न सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २५ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, श्रीपाद अळवणी यांच्या हस्ते तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष सावळाराम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.


यावेळी जिल्हा बँक उपअध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक विद्याधर परब, गजानन तावडे, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी संचालक प्रमोद कामत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सहकारी संस्था सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, सहकारी संस्था सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, बांदा माजी सरपंच अक्रम खान, शेर्ले माजी सरपंच जगन्नाथ धुरी, डिंगणे माजी सरपंच स्मिता नाईक आदी मान्यवर उपस्थित आहेत.

संस्थेच्या सर्व सभासद व सहकार प्रेमी नागरिकांनी कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष घनश्याम बांदेकर, उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, सचिव मयुरी परब यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे