कसई दोडामार्ग नगर पंचायतीचा मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर उपक्रम

 “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर” RRR Center ( रिड्यूस, रियुज आणि रिसायकल ) अभियान अंतर्गत कसई-दोडामार्ग शहरवासियांसाठी नगरपंचायतीने स्वच्छतेत एक पाऊल पुढे टाकत या सेंटर ची सुरवात केली आहे. घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तके, कपडे, जुने चपल-बूट, इलेक्ट्रिक वस्तू इत्यादी वापरण्यास योग्य साहित्य/वस्तू नगरपंचायतने सुरू केलेल्या RRR Center (Reduce, Recycle, Reuse) येथे जमा करता येणार असल्याने शहरातील अशा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागणार आहे. इतकचं नव्हे तर नागरीकांमार्फत "RRR Center" मध्ये जमा करण्यात येणारे साहित्य हे गरजू लोकांनाही देण्यात येणार आहे. 


अशा अभिनव सेंटरची सुरवात कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाजवळ बुधवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरिकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव क्रांती जाधव, रामचंद्र मणेरिकर, प्रशासन व्यवस्थापक प्रकाश पाटील, संजय शिरोडकर पदाधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक श्रीगणेश गावडे व इतर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे