कोनशी प्रकरणातील संशयित अखेर पोलिसांच्या ताब्यात
बांदा:कोनशी येथील एका युवतीवर अतिप्रसंग करून जीवे मारण्याचा प्रकार घडला होता. यामधील संशयित नराधम फरारी होता. त्या फरारी नराधमास बांदा पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून मंगळवारी मध्यरात्री अटक केले आहे.
बाबलो शंकर वरक( वय ३०) असे त्याचे नाव आहे. सोमवारी घटना घडल्या नंतर सदर संशयित फरारी होता त्याला पकडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीसांनी मोठी मोहीम राबवली होती. यात स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक सुद्धा कार्यरत होते. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन सुद्धा सापडत नव्हते. मंगळवारी सायंकाळी पर्यंत त्याला यश आले नव्हते. मंगळवारी रात्री तो घरात असल्याचे वृत्त बांदा पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून त्याला राहत्या घरामधून अटक केले.सध्या त्याला सावंतवाडी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Comments
Post a Comment