ऐतिहासिक पुरातन वास्तू संवर्धन करणार:लखमराजे

 ओटवणे : सावंतवाडीच्या राजेशाही संस्थानचे मूळ स्थान ओटवणे गाव असून या संस्थानाच्या पुरातन ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यासाठी राजघराण्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ओटवणे गावातील संस्थानच्या पुरातन वास्तूंच्या दुरुस्तीसह त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल अशी ग्वाही सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी ओटवणेवासियांना दिली.सावंतवाडी संस्थानला गतवैभव प्राप्त झालेल्या ओटवणे शेरवाळेवाडी ब्राम्हण स्थळाच्या वार्षिक उत्सवानिमित आयोजित कार्यक्रमात युवराज लखमराजे भोसले बोलत होते. 



यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर कोकणसादचे ब्युरो चीफ संदीप देसाई आदी उपस्थित होते.


यावेळी संजू परब यांनी गौरवशाली ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या ओटवणे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य  करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी गावात समाजभिमुख कार्य करणाऱ्या गावातील सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह पत्रकार, पोलीस पाटील, वायरमन, तसेच गावातील कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान दोडामार्ग क्लीनफ्युअल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर यांनी वृक्ष संवर्धनावर आधारीत अप्रतिम वेशभूषासहित सादर करत केलेल 'कंतारा नृत्य' खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मयेकर तर आभार संतोष कासकर यांनी मानले. 


दरम्यान, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे एक ऐतिहासिक नाटक यावेळी पार पडल. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही महाराष्ट्राची दैवते. यांच्या जीवनावरील हृदयस्पर्शी प्रयोग शेरवाळेवाडी - ओटवणे  येथे पार पडला. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत अँड. सोनू गवस

संभाजीराजे पत्रकार संदेश देसाई, राजारामराजे निधी सागर नाईक, येसूबाई सौ. सोनिया शेट्ये, सोयराबाई सौ. गीताली मातोंडकर, अण्णाजी दत्तो- कृष्णा देसाई, हंबीरराव मोहिते अजिंक्य देसाई                               मोरोपंत- सचिन तेंडुलकर      

यांनी साकारले होते. दिग्दर्शक  गणेश ठाकूर यांचं अप्रतिम दिग्दर्शन केल. 




Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे